माझा बाबा....
माझा बाबा....
वटवृक्षासम बाबा तुझी सावली..
या जन्मीची तू माझी जणू माऊली..
जन्म घेता जुळली अंतरीची नाळ. .
बाबा झाली मी तुझी लाडकी बाळ..
जीवनी येता अनेक चढ उतार..
तुझा बाबा खंबीर मला आधार..
बालपणीच्या दाटून येती आठवणी..
प्रेम तुझे ,माझ्या उमलून येते मनी..
माझ्यासाठी पेलूनी अनेक अडचणी..
हवे ते दिले तू मला झणी..
जीवन माझे घेते अनेक आकार..
स्वप्न तुझे करेन मी साकार...