अव्यक्त.....
अव्यक्त.....
शब्दांच्या पलीकडे जाते जेव्हा भावना
तेव्हा मी अशी एक अव्यक्त.....
दुःखाचे तोडुनिया कुंपण जाते त्या पार
तेव्हा मी अशी एक अव्यक्त.....
मनाच्या हिंदोळ्याचा झोका जातो क्षितिजापल्याड
तेव्हा मी अशी एक अव्यक्त....
आठवणीचे पक्षी जेव्हा लागता भरकटू
तेव्हा मी अशी एक अव्यक्त....
गुज मनीचे न बोलता समजे नेत्रातून
तेव्हा मी अशी एक अव्यक्त....
अव्यक्ततेच्या भावनेच्या पाशातून
होऊन मुक्त मी अशी अव्यक्त.....
