कन्यादान
कन्यादान
दुडूदुडू अंगणी धावणारी तिची पावले
आता सप्तपदी चालू लागली
खेळामध्ये लुटूपुटूचा संसार थाटणारी
आता खरच संसाराला लागली
एकक्षण नजरेआड होवू नये वाटणारी
दुसर्याच्या हाती सोपवावी लागली
बाबा बाबा करत मागे फिरणारी लेक
आता परक्याची झाली
रूढी-परंपरांच्या या गर्दीत
त्याला आपली कन्या दान करावी लागली
काय तर म्हणे
दानामध्ये दान श्रेष्ठ असे कन्यादान
पुण्य पडले ज्यांच्या पदरी तोच खरा भाग्यवान
काळजाला पडतात चर्हे करताना हे काम
तरी हसत हसत करतो जो हे काम
तो बाप खरच खूप महान
