STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

ग्रुप

ग्रुप

1 min
195

जपायच नातं म्हणून

निर्माण केला ग्रुप

सगळेच आपलेेेे म्हणून

जपा भावना खूप


कोणी दिला रिप्लाय

म्हणून हरळून जायच नाही

आणि नाही दिला रिप्लाय

म्हणून खंत मानायची नाही


सर्वांची मतं कायम

एकसारखी असतील कशी

नकारार्थी सकारार्थी

प्रत्येकाची वेगळी अशी


राखायचे असेल अबाधित

एकमेकांची साथ

तर द्यावाच लागतो सर्वांना

प्रेमाचा हात


प्रत्येकाच मत

वेगळं असायलाच हव

तरच घडेल इथे

रोज काहीतरी नवं


का बरं होईल

नावडत्या जोकवर हसलं तर

मनातल्य भावना झाकून

थोडसं फसलं तर


फक्त एकच करा मित्रांनो

वेळ काढा थोडा

प्रत्येक जण असावा

दुसऱ्यासाठी वेडा


कधी गडबड कधी बडबड

कधी बरीच शांतता

दाखवून द्याना एकदा

अंतरंगातील एकात्मता


दुरावलेल्य दोन मनात

एक पुल बांधणारा

एखादा असतोच ना

निखळणारे दुवे सांधणारा


ग्रुप असो नात्यांचा

वा असो तो मित्रांचा

आपल्या हजेरीने बनवा

स्वप्नामधल्या चित्रांचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract