STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

दिवाळी सण

दिवाळी सण

1 min
121

आली आली दिवाळी  

गाई वासरे ओवाळी

समृद्धी अन् प्रसन्नता

दिसे त्यांचे चरणी


वेळ आहे धनवर्षावाची

आपले आयुष्य

निरामय असावे 

हिच प्रार्थना धन्वंतरांशी


गोष्ट सत्याच्या विजयाची

अन्यायाच्या प्रतिकाराची

नरकासुरी वृत्तीचा वध करुन

जाणीव ठेवू सत्कर्माची


संपत्ती आणि ऐश्वर्य

सारे असावे नित्य भेटी

लक्ष्मी मातेचे गूढ असे

घरातल्या प्रसन्नतेशी


ईडा पीडा टळू दे 

बळीचे राज्य येवू दे

वामनावतारी विष्णुकडून  

नाश अहंकाराचा होवू दे


सोनियांचे ताट अन्

चंदनाचा पाट 

ओवाळणाऱ्या बहिणीचा

काही वेगळाच थाट


आली आली दिवाळी 

बहिण भावाला ओवाळी

प्रार्थना माझी देवाकडे

व्हावे दीपपर्व चैतन्यमयी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract