प्रेम तुझ माझ
प्रेम तुझ माझ
प्रेम असाव दिव्यासारख
वात होवून पेटणार
एखाद्या ज्योतीने
अंधाराला प्रकाशित करणार
प्रेम असावं आकशासारख
वादळालाही पेलणार
प्रेम असावं नदीसारख
अविरत वाहूनही
शेवटी सागराला भेटणार
प्रेम असाव चंदनासारख
स्वतःला झिजवून घेणार
प्रेम असाव अस
जणू पहिल्या पावसाचा आनंद
दाही दिशात दरवळणारा
पहिल्या मातीचा सुगंध
प्रेम असाव अस
चमचमत्या चांदण्यासारख
स्वतः अंधारात राहूनही
दुसर्यांना प्रकाशित करणार
अस असाव प्रेम तुझ माझ
माझ अबोल प्रेम
तर तुझ व्यक्त होणार

