STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रतिभा

प्रतिभा

1 min
247

काव्यप्रकार अष्टाक्षरी


मनोमंदिरी होतसे

प्रतिभेचे आगमन

जावे गुंफित अक्षरे

मना देती समाधान


प्रतिभेची प्रसन्नता

मम मनास भावली 

विषयानुरुप माझी

काव्यराणी प्रसवली


साहित्यवेलीवरील' 

शब्द घोसच फुलांचे 

मनी घोळती रुळती

क्रम जुळती तयांचे


उतरती झरझर

पानी शब्द प्रतिभेचे

शब्दांत व्यक्त होताना

आनंंदाश्रू साफल्याचे


कविताच माझा श्वास

लाभे मना समाधान

प्रतिभेला वंदूनिया

लेखणीस केले म्यान



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract