STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Inspirational Others

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Inspirational Others

भारत माझा महान

भारत माझा महान

1 min
369

भारत म्हणा,इंडिया म्हणा,म्हणा हिंदुस्तान,

भारत माझा महान,भारत माझा महान


ज्याने स्वावलंबी बनून,      

आधुनिक भारत केला निर्माण,

अशा भारत देशाला प्रणाम,   

तो भारत माझा महान


लहान-मोठा जिथे सर्व एकसमान,

जात-पात सोडून माणुसकीला मान,

अशा भारत देशाला प्रणाम,

तो भारत माझा महान 


होत असे जिथे नारीचा सन्मान,

असे जिथे नारी शक्ती महान,   

अशा भारत देशाला प्रणाम,    

तो भारत माझा महान       


माझ्या लेखनाने करतो या देशाला सलाम,

वाटते गातं रहावे या देशाचे गुणगान,

अशा भारत देशाला प्रणाम,

तो भारत माझा महान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract