STORYMIRROR

Yogita Mokde

Abstract Others

3  

Yogita Mokde

Abstract Others

महिला दिन

महिला दिन

1 min
287

महिला दिन आज साजरा होणार।


घरात बायकोला चप्पल समजणारे,

हुंड्यासाठी तिलाच छळणारे,

स्त्रियांची आज हो गाथा गाणार,

महिला दिन आज साजरा होणार.


भर चौकात डोळ्यांनी निवस्त्रं करणारे,

साथीदारांसवे,तमाशा पाहणारे,

महिलेचा आज सन्मान करणार,

महिला दिन आज साजरा होणार.


मातीच्या मातेला नवरात्रीत पूजणारे,

जन्मदात्रीला (सासूला) वृद्धाश्रमात ठेवणारे,

आईंच्या आज ओवी गाणार,

महिला दिन आज साजरा होणार.


स्त्रीभ्रूणला पोटीच सम्पविणारे,

वैद्यासह, पैशासाठी माणुसकी विसरणारे,

बेटी बचाव बेटी पढाव नारे देणार,

महिला दिन आज साजरा होणार.


भूमातेशी गद्दारी करणारे,

तिला रसातळाला नेणारे,

भारत मातेचा जयघोष करणार,

महिला दिन आज साजरा होणार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract