STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शोध

शोध

1 min
198

शोध घे ललने स्वतःचा

नाही कुठेच तू कमी

नको व्यर्थ न्यूनगंड

बाळगूस तू मनी


विचार आपुल्या अंतरा

केलीस ना कर्तव्यपूर्ती?

क्षेत्र प्रत्येकाचे वेगळे

करी पूर्तता यथाशक्ती


कुणी संसार सांभाळे

सर्वां आपुले म्हणूनी

काम हीच कर्मभूमी

कुणी नका लेखू कमी


कुणी व्यस्त नोकरीत

संसारही सांभाळिते

बरोबरीने कमवूनी

संसाररथ चालविते


झेप घेतली गगनी

क्षणार्धात अंतराळी

पराक्रमी असे नारी

जरी असे लेकुरवाळी


रणांगणी वीरबाला

पराक्रम गाजवती

संरक्षण भारताचे

स्वबळावर करती


समानतेच्याही पुढे

रथ गेला ओलांडूनी

शोध मनासी ललने

कुठले क्षेत्र तुजवाचूनी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract