STORYMIRROR

Neelima Deshpande

Abstract

3  

Neelima Deshpande

Abstract

मनात नसतांना

मनात नसतांना

1 min
317

मनात नसतांना कधी कधी

वाकड्या वळणांनीच

जावं लागतं अन

मनात नसतांना कधी कधी

नशिबालाही मानावं लागतं.


 मनात नसतांना कधी कधी

अपयशी ठराव लागतं

अन मनात नसतांना कधी कधी

लादलेले यशही 

स्वीकारावं लागतं.

 

मनात नसतांना कधी कधी

दुसऱ्यांना दुखवावं लागतं

अन मनात नसतांना कधी कधी

स्वत:लाही दुखवून घ्यावं लागतं


मनात नसतांना कधी कधी

इतरांना हसवाव लागतं

अन मनात नसतांना कधी कधी

इतरांसाठी स्वत: ही हसाव लागतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract