STORYMIRROR

Neelima Deshpande

Tragedy Inspirational Others

3  

Neelima Deshpande

Tragedy Inspirational Others

स्वप्नील स्वप्न माझे

स्वप्नील स्वप्न माझे

1 min
12.1K

स्वप्नात पाहिले मी, स्वप्नात न्हाहले मी...

स्वप्नील स्वप्न माझे घोकीत राहिले मी!


स्वप्नातला सुगंध, होऊन त्यात धुंद...

त्या धुंदीच्या स्वरांनी नवगीत गाईले मी!

स्वप्नील स्वप्न माझे, घोकीत राहिले मी...


स्वप्नी कधीच नव्हत्या, विराण कुंद राती...

त्या धुंदीच्या बळाने, धिक्कार साहिले मी!

स्वप्नील स्वप्न माझे, घोकीत राहिले मी...


मज तारीले जयांनी, ती स्वप्न फार थोर...

जीवनात माझीया मला, मग त्यांनाच वाहिले मी!

स्वप्नील स्वप्न माझे, घोकीत राहिले मी!


कटुता साऱ्या जगाची, जाळीत जीव गेली...

खोट्या जगात होते, हे स्वप्नगीत गाईले मी!

स्वप्नील स्वप्न माझे, घोकीत राहिले मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy