आहेर
आहेर

1 min

39
ताई झाली माझी'आई'
घास मला भरवताना,
तिला तिच्या भुकेची पर्वा नाही!
लोण्या वाणी माय,
वडा सारखा बाप अन
जीव लावणारी ताई...
खर सांगायच तर,
यांच्या शिवाय मला
वेगळया दुनियेची गरज नाही !
दिवसा अन् रात्री
ते बांधतात इतरांसाठी
महाल, घर आणि बंगले
कापसासारखे मऊ नसले तरी....
माझ्या माय- बापचेच हात
मला वाटतात चांगले!
होइन मी मोठा तेंव्हा,
देईन त्यांना आराम अन
ताईला हक्काच माहेर....
राखी पौर्णिमेला भेटवस्तू नको पण
लहान भावाकडून हाच हवाय
तिला तिच्या लग्नात आहेर!