तुझे नि माझे
तुझे नि माझे
चंद्र, सूर्य मज नकोत काही...
नको तारका, नकोच सागर ;
हात हवा तव आधाराचा,
हवी तुझी मायेची घागर.
नको स्वर्गीच राज्य मला
अन गगनातील ती नको चांदणी...
तुज हास्य मज त्याहूनी मोठं ;
ठसून राहील मनी कोंदणी...
देवलोकीचे नकोच अमृत
नको कुणाची तूप नी साखर ;
गोड मला ती तुझ्या हातची
माळावरची भाजी नी भाकर...
नकोच मजला उसने वैभव
अन् लखलखणाऱ्या दिशा दाही...
मात्र तुझा तो आशिषाचा
शिरी असू दे हातच आई...
