अखेरचा निरोप
अखेरचा निरोप


आई बाबा घेतला आज
तुमचा, अखेरचा निरोप..
आणि लावलं तिथेच,
तुमच्या आठ्वणींच रोप !
अखेरचाच होता ना हा निरोप ?
तरीही मनी होती एक होप....
निदान काही शब्द बोलाल....
पण तुम्ही केलीत घाई जाण्याची....
नाहीच पहिली वाट,
आमच्या येण्याची!
लावलेले इवले रोप
होईलच उदया मोठं....
आठवणीत अश्रूंची फुले ओघळतील आमच्या गालावरून.....
आणि तुम्ही
हसत आशीर्वाद तेंव्हा
भर भरून देत असाल वरुन !
होऊन उद्या मोठा वृक्ष,
हे रोप देईल सावली.
कळेल तेंव्हा सर्वांना उभे इथे आजही माझे कणखर विठोबा आणि माझी प्रेमळ माऊली!
फ़ांदीवर बनतील पक्षांची घरटी,
पुन्हा एकदा होईल चिवचिवाट पक्षांचा माणसांचा जसा तुम्ही असताना होता....
तोवर मात्र वाट पाहणारे दार बंदच राहील आता!