स्त्री.....

स्त्री.....

1 min 351 1 min 351

कधी फुलांइतकी कोमल 

कधी पाण्यासारखी निर्मळ  

       कधी पहाटेच स्वप्न 

       कधी अवशेष भग्न 

कधी स्त्रीदेहाचं वर्णन 

कधी चरित्र्यच हनन 

    कधी मायेची फुक 

     कधी वासनेची भूक 

वेदनेचा आकांत 

राग आहे संतप्त 

   मनात भावनांचा हल्लकल्लोळ 

  कधी कुणाच्या मनातील संशयकल्लोळ 

कधी मी भासते पहाटेचा मंद स्वर     

कधी झेलते मी भीबस्त नजर 

     कुठेच नाही मला सुरक्षा 

     प्रत्येक ठिकाणी केली जातीय दुर्दशा 

करून मला विवस्त्र 

चालतच राहते न्यायालयाचे सत्र 

     कुठेच मिळत नाही न्याय 

     वाढतच चाललाय अमानवी अन्याय 

बलात्कार स्त्री हत्येचं पर्व कधी संपणार

माणूस म्हणून मी सन्मानानं कधी जगणार

   


Rate this content
Log in

More marathi poem from Rupali Shinge

Similar marathi poem from Tragedy