STORYMIRROR

Rupali Shinge

Tragedy Others

3  

Rupali Shinge

Tragedy Others

व्यसनमुक्तिचा जागर

व्यसनमुक्तिचा जागर

1 min
12.1K

बुद्ध भगवानाचे बोल 

शरीर संपत्ती अनमोल 

निरोगी राखण्या तयास 

जागरूक होऊ वेळेवर 

सारे मिळुनीया करू 

चल व्यसनमुक्तीचा जागर १ 


नको भुलू तू अमिषाला 

दोष नको देऊ नशिबाला 

दारूबाज मित्र तो

नको रे संगतीला 

मन चंचल ते फार 

त्यासी घालावा आवर   २ 


देह तुझा वाढविण्या 

माउलीचे कष्ट फार 

दारूच्या व्यसनाने 

होईल रोगाचे आगार 

नको हिसकावून घेऊ 

म्हातारपणाचा आधार  ३ 


लय होते बरबादी 

दूर जाते सुख शांती 

जीवापाड जपलेली 

सारी तुटतात नाती 

आई बाप, अर्धांगिनी 

चिल्या पिल्याचा कर विचार ४ 


नव्या फॅशनचा ट्रेंड 

पार्ट्या बडे ,मॉडर्न 

मित्राच्या संगतीनं 

तू घेशील गमतीनं 

थोडी थोडी करून 

तिची सवय जडणार  ५ 


शोध इतिहासाच्या पानात 

शिवबा, भीमाच्या चारित्र्यात 

दारूचा थेंब ना स्पर्शीला 

त्यांनी उभ्या आयुष्यात 

एक शूरवीर ,एक ज्ञानाचा 

उसळता तो सागर     ६ 


पंचशीलातले पाचवे 

महान ते शील 

व्यसनाच्या हानीचा 

अर्थ तयात खोल 

व्यसनापासून अलिप्त 

राहण्याचा तू करावा निर्धार ७ 


टाक निश्चयाचे पाऊल 

घरी दारी सुखाची चाहूल 

पालवी आशेची फुटेल 

जगण्याला नवी दिशा मिळेल 

व्यसनमुक्त होण्या तुला 

व्यसनमुक्ती केंद्राचा आधार ८ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy