चोरतं
चोरतं
खोटं तू खऱ्यासारखं बोलते
तुझे तू दगे हळूच खोलते
तुझं ते पाहाणं नजरेला चोरतं....
खरं लपेना खोट्या पडद्याने
दुरावा निर्माण होई दग्याने
तुझं ते लाजणं जीवाला लागतं....
माझे तुझ्यासाठी वाईट हाल
जगावेगळी निघाली तुझी चाल
तुझं ते तिरकं हसणं रागाला भेटतं....
