प्रथा आणि परंपरा
प्रथा आणि परंपरा
प्रथा आणि परंपरा
ज्या दिवशी होतील
मुलामुलींना सारख्या,
माहेर असो वा सासर
लेकी होणार नाहीत
कुणाच्याच प्रेमाला आणि मायेला पारख्या !
छाटून पंख,
घरात डांबून लेकींना...
करू नका चाकोरीत बद्ध...
त्यापरी, शिकवून मुलांना
करा जागृत ...कोणते आहे वर्तन निषिद्ध...
हार-जीतीच्या आव्हानात मिळेल
नात्याला अधिक मान जेव्हा
एक स्त्री इतर स्त्रियांचा करेल खरा सन्मान!