STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

4  

Neelima Deshpande

Others

माझ्या लहानपणी

माझ्या लहानपणी

1 min
196

माझ्या लहानपणी, 

चॉकलेटच्या बंगल्यात

भान हरपून रमायची लेकरं

आणि गायची आनंदाची गाणी.


माझ्या लहानपणी, 

धूळीत अन मातीत होती खेळण्याची आम्हाला मुभा,

इनफेक्शनच्या भीतीचा बागूलबुआ नव्हता कधीच आमच्या मागे उभा!



माझ्या लहानपणी, 

पक्ष्यांसवे गायचो आम्ही स्वच्छंदी गाणी, कुणाच्याही शेतात शिरुन हक्काने,

मनसोक्त फळे खाण्याची अनुभवली आम्ही मेजवानी.



माझ्या लहानपणी, 

मने रमायची पऱ्यांच्या राज्यात.

सुख 'मानन्यावर'असते समजून राजाराणीच्या गोष्टींचाही

शेवट नेहमीच व्हायचा आनंदात!



* सदर विचारांच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.



Rate this content
Log in