STORYMIRROR

Neelima Deshpande

Romance

3  

Neelima Deshpande

Romance

प्रतिमा

प्रतिमा

1 min
199

जिथे तिथे तुझा वास,

मनी लागे तुझाच ध्यास!


पहाटेच्या साखर झोपेतून उठताना,

मुखी "कराग्रे वसते"

नयनी मात्र तुझीच प्रतिमा दिसते!


"अन्न हे पुर्ण ब्रम्ह" म्हणताना,

तुझी आठवण येते...

पापणीच्या आड मग आभाळ दाटते. 


"शुभं करोती कल्याणम"च्या सुरात 

मंद दिवा प्रकाशतो,

त्यातच तुझा उजळलेला मुखडा डोकावतो.


स्वप्नातही होतो तुझा भास,

म्हणूनच जिथे तिथे तुझा वास

मनी लागे तुझाच ध्यास!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance