STORYMIRROR

Neelima Deshpande

Others

4  

Neelima Deshpande

Others

अर्पण पत्रिका ©®

अर्पण पत्रिका ©®

1 min
599

क्षितिजावर मला एकटीलाच वाट बघण्यासाठी सोडून

पुन्हा भेटेल असं सांगून तू निघून गेलास...

कितीक वर्षे झाली, मी अजुनही तिथेच उभी आहे. 

वाट बघताना घड्याळाचे काटेही फिरुन फिरुन शेवटी तिथेच येताहेत

जाताना तू दिलेली ती फुलं, 

आल्यावर तुझंच स्वागत करण्यासाठी जपून ठेवली होती

पण आता...

आता फुलं तर सुकून गेलीत...

हाताचा सुगंध मात्र कायम आहे  

तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता,

तुझ्याच आठवणींत, पुसट होत आसवांनी धुऊन निघाल्यात...

तुला द्यायला माझ्या कवितांचा संग्रह नाही, अर्पणपत्रिका मात्र तेवढी सुरक्षित आहे...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్