Supriya Devkar

Tragedy


4.0  

Supriya Devkar

Tragedy


गुदमरला श्वास

गुदमरला श्वास

1 min 433 1 min 433

आज तिच्या देहावर ओरखडे किती पडलेत 

जुलमाच्या कापडाआड सारेच निपचित दडलेत 

विळख्यात त्यांच्या होता गुदमरला श्वास माझा 

जन्मभराची न विसरणारी दिली मला सजा

सैरभैर लाटेसारखी किनारा मी शोधत होते 

आसवांना पापण्यांत सदा आडवत मी होते 

होते नराधम सारे त्यांना नव्हती कसलीच शुद्ध 

घातला घाला मिळून सार्यांनी झाले मी निर्बुद्ध 

अंधारी खोलीच झाली होती जवळची सोबती

वेदनाच नाचत होत्या सदैव धरून फेर भोवती

का आला जन्म बाईचा माझ्याच नशिबी 

सार्यांची सहानुभूती वाटू लागली फसवी

नाही जात पुसला हा किळसवाणा डाग 

सदैव भासतोय दाहीदिशात हा डसणारा नाग 


Rate this content
Log in

More marathi poem from Supriya Devkar

Similar marathi poem from Tragedy