आमचे शंभूराजे...
आमचे शंभूराजे...
...
गेली अनेक वर्ष हात धुवून मागं लागलेल्या
औरंग्याला माझ्या राजाची सावली सुध्दा हाती लागली नसती,
जर आपल्याच काही महाभागांनी फितुरीच केली नसती...
आपल्या धाकल्या धन्याला तमाम मरण्यातनांना
समोरच जावं लागलं नसत,
जर आपल्याच काही महाभागांनी फितुरीच केली नसती...
आपल्या छत्रपतींच्या छाव्याला
त्या औरंग्याच्या हातून हालहाल होऊन मरावं लागलं नसत,
जर आपल्याच काही महाभागांनी फितुरीच केली नसती...
संताप होतो, चिडचिड होतेय, वाईट वाटतयं,
फक्त याच विचारांनी की आपल्याच काही महाभागांनी फितुरी केली.......
जर फितुरी केली नसती...तर आज इतिहास काही वेगळाच असता