STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy

3  

Ganesh G Shivlad

Tragedy

कली महिमा

कली महिमा

1 min
225

उदंड झाला हो, कली या युगी,

क्षणोक्षणी वणवा, येथे पेटतो आहे..!


मुकी झाली हो, सज्जन ती वाचा,

पैसा मात्र बिनधास्त, येथे बोलतो आहे..!


मेल्यावर हो माती, होणार मड्याची,

पण मातीचसाठी, तो आज भांडतो आहे..!


वितभर जमिनीच्या हो, तुकड्यासाठी,

भाऊच भावाच्या जीवावर, आज उठतो आहे..!


पोसतो घरात आज, तो काळ्या कुत्र्याला,

पण जन्मदात्याला बाहेर, हाकालतो आहे..!


खोदली हो दरी खोल, त्याने नात्यागोत्याची,

वीण घट्ट नात्याची, आज तो विस्कटतो आहे..!


पोटची हो पोरी, पण बापच बसतो उरी,

नात्याला काळीमा, तो आज फासतो आहे..!


षंढ झाली हो, माणुसकी आज इथे,

माणूसच माणसाला, उभ्याने कापतो आहे..!


थांबवा हो देवा, हा घोर कली महिमा,

दान हेच आम्ही आता, आज मागतो आहे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy