शापित राजकुमारी
शापित राजकुमारी




दगाबाज प्रेमाचा, मला शाप मिळालेला..
प्रेमाचा अर्थ, प्रियकराला न कळालेला..
प्रेमाच्या धुंदीत मी स्वतःला हरवून बसलेले..
त्याच मात्र अभिव्यक्त होण, मनापासून नसलेले..
मी दिला सोडून राजरस्ता, सुखाचा..
त्याने पेरून ठेवल्या पायघड्या दुःखाच्या
मी असते मनातल्या जखमांवर पांघरून घालून..
तो मात्र, खुश त्याच्या पुरुषार्था बद्दल चारचौघात बोलून..
रोज रोज मी स्वताच्या नशिबाला दोष देत बसते..
त्याच्या मात्र मी, आजकाल ध्यानी मनी नसते.
मुलींच्या आयुष्यात खुपदा असच होत..
हृदयात जपलेल प्रेमच, बदनाम होत...
सर्व काही हरवले, धन, तन, अन् आप्त स्वजणही
शापित ठरली राजकुमारी, प्रेम जखमा घेऊन देही...