STORYMIRROR

Chetan Soshte

Tragedy

4  

Chetan Soshte

Tragedy

हजारो प्रश्न

हजारो प्रश्न

1 min
390

मनात रोज हजारो प्रश्न उठतात,

पण उत्तराची उकल होत नाही.

रोज प्रश्नार्थक डोळ्यांनी झोपतो,

उद्याच्या उत्तरासाठी.


मनातली कालवाकालव व्यक्त करायला,

कोणाची तरी कमी आहे याची जाणीव,

आणि आहेत त्यांची सोबत असण्याची,

उणिव नेहमीच सतावते.


स्वार्थाशिवाय कोणीच बोलत नाही,

दोघांमध्ये असलेली पोकळी दिसूनही,

 ती भरण्याइतकं मोठं मन कोणाचं नाही.


डोळ्यांवर पट्टी बांधून काळजीच्या,

ओझ्याखाली सगळे दबलेत,

प्रत्येकाला स्वतःची जागा पाहिजे,

(so called "personal space")


शांततेच्या शोधात कुणी स्मशानात तर

नाही बसत ना !

त्याच मरणसुन्न शांततेचा आता इतका,

तिरस्कार वाटतो. 

की चितेसारखा मीच जळत बसतो,

कधीही न अनुभवलेले चटके,

सहन करण्यासाठी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy