STORYMIRROR

Chetan Soshte

Drama Thriller

2  

Chetan Soshte

Drama Thriller

मसनवट

मसनवट

1 min
164

  मरणसुन्न शांततेत ,मी अंधाराला होतो कापत,

  स्वतःच्याच हरवलेल्या पाऊलखुणा मी होतो चाफत.


  गर्द शांततेत पाहिलं मी,माझीच चिता होती जळत,   

अंगाचा हरएक लहू आगीसोबत बाहेर होता पळत


  शेकडो किंचाळ्या,फाडत होत्या माझे कान,

  ६ फुट सरणावर निपचित निजली होती माझी जान.


  मसनवटेतला हरएक-जण, क्रुर सैतानासारखा होता भासत,    

  जळत्या माझ्या चितेकडे पाहून नरभक्षासारखा होता हासत.


 मी पुर्ण जळतो की नाही,याची सारे काळजी होते घेत,

 काठीनं ढोसकून माझ्या मड्याला आगीचे चटके होते देत.


 आक्रोशाचा आवंढा, मी गळ्यातच होता साठवला,

 दारुच्या शिंतोड्यांनी नरभक्षांनी देह माझा बाटवला.


 कवटीच्या माझ्या फुटण्याचा,आवाज चौफेर दंगला,

 शेवटच लाकूड जळेपर्यत हा पाशवी खेळ रंगला.                  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama