STORYMIRROR

Chaitali Writes

Tragedy

4  

Chaitali Writes

Tragedy

पोकळी 😘

पोकळी 😘

1 min
487

आज हातांची ओंजळ धरली

दूर त्या वाटेवर काहीसे चांदणे सांडले होते

थोडं जवळ जाऊन निरखून पहात राहिले

नेमके काय असावे बरे?

विचार मनात सलत राहिले मग एकदमच आठवले

अरे! हे तर आपणच आहोत

एकमेकात हरवलेले ओठांवर अलगद हसू उमटले

आणि डोळ्यात चमक न दिसणारी...

वेढून गेले सारेच क्षण भरभर...

मनाच्या गाभाऱ्यात मग तुम्हीच दिसू लागलात

हसू लागलात चिडवू लागलात मला नेहमीसारखेच

लाजेने थोडी हरवलेच मी

तितक्यात कुकरच्या शिट्टी चा आवाज कानी पडला

धावत गेले किचनकडे ओट्याजवळ घुटमळताना

वाट तुमची पाहू लागले तुम्ही येणार आता जेवायला

भरभर ताट वाढून लगबगीने डायनिंग टेबलावर ठेवले

पण मग जाणीव झाली मनाला

इथे तुम्ही नाहीच....

मुलांना जेवू घालून ताटाकडे एकटीच पहात राहिले

कामं आवरली, बेडरूमचे दार कसेबसे उघडून

आत आले.....

तुमचे कपडे, तुमचे घड्याळ, पाकीट, लॅपटॉप, मोबाईल

सारंच जपलंय हो...

हल्ली त्यातच तुम्हाला शोधत असते..

तुमची उशी अजून तिथेच आहे

उजव्या बाजूला... बोलते ती माझ्याशी अधून-मधून

विचारते मला, कुठे आहेत माझे मालक?

आरशाच्या कपाटात आजही 

तुमचे दाढीचे सामान जपून ठेवले मी..

स्वच्छ धुऊन ठेवते अधेमधे...

त्रास होतो मनाला खूप..

पण त्यात असणाऱ्या तुमच्या स्पर्शाच्या जाणिवेने

मन सुखावते माझे.....

आज बर्‍याच दिवसांनी आपल्या गाडीत प्रवास केला

वाटलं क्षणभर शेजारी तुम्हीच आहात

पण स्पीड ब्रेकर ने घातच केला माझा

स्टेरिंग वरचे तुमचे हात अचानक नाहीसे होताना 

पाहिले भ्रम तुटला माझा.....

एकटेपणाचा नाद कानांवर आदळु लागला....

डोळे उघडुन समोर पाहीले

तर दिवा तेवत होता तुमच्या फोटो पुढे....

आणि हसणारे तुम्ही फक्तच पहात होते

माझ्याकडे निरखून एकटक

माझ्याकडे निरखून एकटक

                पतीच्या निधनानंतर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy