माझिया मना जरा थांब ना
माझिया मना जरा थांब ना
1 min
312
माझिया मना जरा थांब ना
होऊ दे सकाळ जरा,येऊ दे आवाज खरा .
होईल थोडा शब्दांचा गुंता, होईल थोडी चुकामुक
थकू नको विसरू नको, तू फक्त चालत रहा
कोणी करेल कौतुक, कोणी बोलेल उणे दुणे
तु तरीही फक्तच शांत रहा...
कोणाच्या प्रश्नांना नको होऊस तू भागीदार
तुझ्या कल्पनेच्या प्रांतात तूच मग रमुन जा
थोडी येईल अडचण, थोडी होईल चणचण
तु फक्त मार्ग काढत राहा..
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू बन
तुझ्या प्रत्येक खडतर वाटेचा रस्ता तू बन
आठवणींना जरा दूर ठेव, अनुभवांना सोबत कर
हसत राहा रमत रहा
नियतीच्या या खेळात तूच तुझा स्वाभिमान हो
तूच तुझी ओळख आणि तूच हो तुझ्या...
आयुष्याची संघर्षवाट...
