रंग माणुसकीचे
रंग माणुसकीचे
1 min
141
अपेक्षांचेच देह सारे
अविश्वासाचीच पाखरे
इथे कुणाला नाही कुणाचे
काहीही देणेघेणे
प्रत्येक जण शोधतोय फक्त
स्वतःपुरतीच पाऊलवाट
रंगबेरंगी शब्दांद्वारे
झेलत आहे नात्यांची लाट
खरा कोण खोटा कोण
कळत काहीच नाही
तरीही शब्द पेरत जातात
आपलेपणाची ग्वाही
धुरसटपानाच्या चष्मयावरती
साचत चालले मोहाचे जाळे
रंग माणुसकीचे किती हे निराळे....
एकदाच येवो पाऊस वारा
रंग सारे सफेद व्हावे
माणसामधल्या माणुसकीला
नितळ स्वच्छ जागेपण यावे....|
