अश्रू..
अश्रू..
1 min
322
अश्रूलाही मन असावे झरा होऊन वाहत जावे
खट्याळ खोडकर बालपणी मग,
हट्ट होऊन व्यक्त व्हावे...
कितीतरी सुंदर ते अश्रू शब्द जाता गावी
सोबत होऊन बरसावे
हळव्या क्षणांची सोबत व्हावे
कधी तरुणीच्या ओढणी वर सांडावे
संघर्ष ,तडजोड ,संकटातही, घट्ट आधार होऊन भांडावे
अश्रू लाही मन असावे....पहाडागत स्थिर व्हावे
म्हाताऱ्याच्या काठीलाही खुळे होऊन बिलगत जावे
धुरसट चष्म्याच्या काचांवरून धुके होऊन पसरत जावे
धुके होऊन पसरत जावे......पसरत जावे....
अश्रूलाही मन असावे झरा होऊन वाहत जावे
झरा होऊन वाहत जावे...
