खंत
खंत
आला पूर
गेलं वाहून
सारं गाव मनातलं
इवलीशी घरं माझी
इवलसच छप्पर
दाटुन यायचं आभाळ तसं
मिटल्या सुकल्या डोळ्यात
साठवून राहायचे सूर मग,
कोमेजलेल्या गळ्यात
आधी तसं वाटायचं
आपलंच गाव सारं
आता मात्र...
उमाळे दाटतात
पोरक्या जमिनीत...
इवल्याशा घरातही
माया होती आभाळा एवढी
आता मात्र...
चार भिंती, एक दार
एकट्या नदीत
पूरच फार..
आधी होती एकच पणती
उजेड घरात सूर्या गत
आता लागतात दिवे हजार
मन मात्र काळोखात
पण मात्र काळोखात..
