STORYMIRROR

Nishigandha Kakade

Tragedy Inspirational

4  

Nishigandha Kakade

Tragedy Inspirational

कोण आहे मी??

कोण आहे मी??

1 min
570

कोण आहे मी ??

आईच्या गर्भाची माझीच चाहूल पहिली,

की वडीलांच्या आनंदाची गुरूकिल्ली?

बहिणीची बहिण असण्याची आस,

की तिला भाऊच हवा हा घरच्यांचा ध्यास?

काय होईल? काय नाही ?सांगेल समय,

की असेल नातलग आप्तेष्टांनचा चर्चेचा विषय?

माझे मला ठावूक नाही ग आई,

मी नक्की कोण पुरुष की बाई?

याहून वेगळा पंथ जर असला माझा,

तर लोक देतात का ग भयाण सजा?

मी जरी तुझ्या गर्भात असलो नंबर दुसरा,

तरीही प्रेम करशील का चेहरा ठेवून हसरा??

की तुलाही दुःख होईल माझ्या येण्याचे?

की सांत्वन करशील माझ्या नसण्याचे?

सुखाची सर असेन ना ग नक्की मी? 

की तुला लोटेन पुन्हा दुःखाच्या खाईत मी?

हे आभाळ, हे चांदणे मी पाहिलं का ग??

की संपेल माझे जीवन या साडे तीन महिन्यात ग?

तू जाशील का ग मला दूर दूर शोधायला?

मी आहे कोण हे त्या डॉक्टर कडे पाहायला?

तो सांगेन ती पूर्व दिशा नको ना ग मानूस!

मी अंश आहे तुझा हे खोटे नको ना पाडुस!

निभावेन ना ग मी तुझी साथ!

बाबांना पण समजावं ना तू धरून हाथ!

आपलाच जीव आहे म्हणावं !

कशाला हवा माझ्या अस्तित्वाचा बनाव!

माझ्या अस्तित्वाचा बनाव! 

मझ्या अस्तित्वाचा बनाव!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy