STORYMIRROR

Nishigandha Kakade

Abstract Romance Fantasy

3  

Nishigandha Kakade

Abstract Romance Fantasy

प्रेमाचं जग पुन्हा बनवू

प्रेमाचं जग पुन्हा बनवू

1 min
154

माझ्या अस्तित्वाचे पूर्णत्व तुझ्या सोबत असण्यात आहे,


कोमेजल्या मनातले प्राण तुझ्या हसण्यात आहेत,


जीवन संगीताची सप्तसूर मैफल तुझ्यामुळेच सजते,


 तुझ दूर असंन देखील या डोळ्यांना वारंवार पानवत राहते,


मनातील एकटेपणाची भीती नेहमी मनात काहूर पेटवत राहते,


तुझ हे वेळीअवेळी असणं नसणं आता खरंच पुरे झालं ,


तुझा हक्क माझा ,तुझा श्वास माझा,तुझ हास्य माझं,


तुझी प्रीत माझी,तुझी ओढ माझी, तुझ सर्वस्व आता फक्त माझच आहे,


हे आता साता जन्मासाठी च नातं कायमच ठरवून टाक तू,


माझ्या सोबतिचा हात घट्ट धरून चाल तू,


आहे प्रेम तुझं पण! पुन्हा एकदा सांगुण टाक तू,


जगुयात ना ते जुने क्षण पुन्हा एकदा ,


भेटुयात ना त्या आठवणींच्या किनारी पुन्हा एकदा


तुझ हास्य माझ्या मुळे येईल असे वागेन मी


माझं! तुझं !हे आपल कसं होईल असे वाग तू!


चल आता आपण आपलं स्वतःचं एक वेगळं अस जग बनवू,


एक एक वीट प्रेमाने लावू आणि घरटं दोघांचं

थोड सजवू आपुलकीने,


थोड भिजवून टाकू आपल्या हळवेपणाने,


आणखी कणखर बनवू आपल्या खंबीर पणाने,


चल उंबरा ओलांडून आत जाऊ एक मताने,


असच रहा कायम फक्त तू माझा बनून,


मी घेईन रे माझं सर्व अस्तित्व तुझ्यात सामावून!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract