तसा तू!
तसा तू!
1 min
462
शिंपलितला मोती जसा,
सुंदर आणि शुध्द स्वरूप,
अगदी तसाच तू आहेस,
या माझ्या मनात सुखरूप!
आळवावरच दवबिंदू जसा,
नितळ आणि स्वच्छ चमकतो,
अगदी त्याच जला प्रमाणे,
तू माझ्या मनावर राज्य करतोस!
आकाशातील हलकीशी चंद्रप्रभा ,
जशी मंद प्रकाशमय दिसते,
तूझे माझ्या जीवनात असनेही,
तसेच हळुवार अलोकित भासते!
चातक पक्ष्याची आतुरता जशी,
पहिल्या पावसाच्या सरीकडे,
तशी ओढ तन्मनीची माझी,
तुझ्या सहवासाच्या वाटेकडे!
