पर्यावरण
पर्यावरण
दुपारच्या रणरणत्या उन्हात
सूर्य ओकत होता आग
कशाला करिता वृक्षतोड
अन् उजाड करता हो बाग...१!
बघता बघता वृक्षांची
झाली बघा कत्तल किती
पाण्याचा गेला खोल तळ
माणसाची बदलली निती...२!
एक चिमणी रोज येते
तिची व्यथा सांगून जाते
घरासाठी जागा मिळते का?
रोज शेधत शेधत फिरते....३!
वृक्ष वेली नष्ट जाहली
घरटी सारी नष्ट झाली
चिमण्यां पाखरांची गाणी
ऐकावयाला कुठे हो आली?...४!
वृक्षतोड करूनी आपण
सृष्टीचे सौंदर्य आणले धोक्यात
प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम
घ्या हो तुम्ही डोक्यात....५!
उष्णतेच्या लाटेवरती
कासावीस झाले सारे जीव
होरपळून गेली धरणीमाता
वृक्षारोपणाची ओलांडा शीव...५!
