STORYMIRROR

Pratibha Vibhute

Others

3  

Pratibha Vibhute

Others

क्रांतीज्योती (सावित्री माई)

क्रांतीज्योती (सावित्री माई)

1 min
174

माझी आई सावित्रीमाई

पहिली शिक्षिकेचा मान

समस्त महिलांना मिळाला

आज शिक्षणाने बहुमान


महिलांच्या शिक्षणासाठी

शेण,मातीचे गोळे झेलते

कष्ट किती सहन करूनी

वसा शिक्षणाचा पुढे नेते


आज सावित्रीच्या लेकींना

शिकवण देई ज्ञानज्योती

उपकार मानावे माऊलीचे

जिणे घडविली क्रांतीज्योती


महिला झाली शिक्षित

चूल नी मूल यातून मुक्ती

उच्च पदावर होत आहे

जगात महिलांची नियुक्ती


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை