पुरणपोळी
पुरणपोळी
1 min
200
सणवार, पाहुणे येता घरी
बेत पुरणपोळीचा असे
महिलांची होते धावपळ
भरलेले ताट छान दिसे...१!
पूरण पोळीचे भरले ताट
महाराष्ट्रात भोजनाचा थाट
ताटाभोवती सुंदर रांगोळी
तांबे, भांडे नी नक्षीदार पाट...२!
चणाडाळ, जायफळ ,गूळ
बडीशेपची चव लज्जतदार
मऊशार तयार पुरणपोळी
शुद्ध तुपाचा घाला वरून धार...३!
आमटी, भजे, कुरडई, पापड
चटणी, कोशींबीर तोंडी लावा
गरमगरम पुरणपोळीचा स्वाद
आमटीचा फुरका सुरकण घ्यावा...४!
महाराष्ट्राची पुरणपोळी मस्त
सर्वत्र तिची ख्याती बघा न्यारी
आग्रह करण्याची रीत वेगळी
पाहुणचार महाराष्ट्रात भारी...५!
