प्रीत
प्रीत
नित्य पाहता तुजला
लागे भेटीची रे आस
कुठे दिसतो शोधते
माझे नेत्र आसपास...१!
जीव झाला कासावीस
काय झाले समजेना?
कसा जाईना दिवस
मन कशात रमेना...२!
कसे सांगावे रे तुला
मन माझे तुझे झाले
ध्यास तुझाच लागता
ओठी प्रेम शब्द आले...३!
प्रीत माझी उमलली
गंधाळली रातराणी
दोघे मिळून गाऊया
प्रेम पाखरांची गाणी...४!
मन माझे रे निर्मळ
झाली प्रीत उधळण
तुच माझा जोडीदार
प्रेम रूपी पखरण...५!

