STORYMIRROR

Pratibha Vibhute

Romance

3  

Pratibha Vibhute

Romance

हदयी प्रीत जागते

हदयी प्रीत जागते

1 min
227

प्रीत उमलून सख्या

स्वप्न सुंदर रंगते

अलवार स्पर्शातून

प्रीत हृदयी जागते..१!


मनोमनी मिलनाच्या

गंध धुंदीत न्हाहते

विसरून देहभान

सुख तुजला मागते...२!


किती आले रे संकट

देई सदैव आधार

कणखर तुझ्या पाठी

देई जीवनी आकार...३!


मनी अबोल भावना 

हळू तुजला सांगते

सदा हास्य मुखावर

प्रीत हदयी जागते...४!


देह जरी दोन असे

एकरूप होई श्वास

सदा मिलनाची लागे

जीवनात सख्या आस...५!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance