STORYMIRROR

Pratibha Vibhute

Others

3  

Pratibha Vibhute

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
168

निळसर वर आकाश

शुभ्र मेघ नक्षीदार

सुंदर दिसे नजराणा

कोण याचा शिल्पकार?


डोंगराची दिसे रांग

दूरवर दिसे क्षितीज

धवल दिसता पर्वत

हिरवाईचे लावू बीज


डोंगराच्या उंचावरून

वाहती पाण्याचे पाट

सुंदर दिसतो देखावा

डोंगर,दऱ्या नी हा घाट


हिरवागार नेसुन शालू

वसुंधरा सुंदर सजली 

लाल फुलांची ती नक्षी

नखशिखांत भिजली 


निसर्गाचा सुंदर नजारा

 साठवून ठेवू मनोमनी

रक्षण करूनी सारेजण

उपभोग घेऊ क्षणोक्षणी


Rate this content
Log in