राष्ट्र ध्वजाचे तीन रंग
राष्ट्र ध्वजाचे तीन रंग
1 min
204
पांढरा, केशरी, हिरवा नी
मध्यभागी ते अशोकचक्र
प्रतिक दावी समानतेचे
भारताकडे नका पाहू वक्र
संदेश देती तीन रंगात
पांढरा असे सदैव शांत
शालीनता नी समर्पणाचा
नसे कुणाला कसली भ्रांत
भगवा असे सात्विकतेचा
उगवतीची दिसती लाली
रंग आत्म्याची आणि त्यागाचा
भारतमातेच्या टिळा तो भाळी
सुजलाम, सुफलाम देश
समृध्दीचा रंग तो हिरवा
निसर्गाच्या सानिध्यात येई
ऋतू वेगवेगळा बरवा
अशोकचक्र ठेवीते इच्छा
अभिमान आहे भारताचा
फडकत राहो निरंतर
विकसनशील या देशाचा
