सांग ना ग आई
सांग ना ग आई
सांग ना ग आई मी
मोठा कधी होणार?
दादा सारखी सायकल
मला कधी घेणार?
सूट बूट घालून दादा
कशा ऐटीत फिलतो
ऐकत नाही म्हणत ग
पाठीत धपका मालतो
दादा म्हणतो मला आई
आहे नुसता ठोकळा
काही येत नाही याला
दिसतो गोल भोपळा
ताई म्हणते मला सदा
गोल गोल आहे गोलू
लागावून मलाच म्हणते
बोबले नकोच बोलू
आईबाबा तुम्ही दोघ
करता माझे लाड खूप
आजी बाबांना तर आई
पाहून मला येतो हुलुप
फिलतो- फिरतो
मालतो-मारतो
लागावून- रागावून
हुलूप - हुरूप
लहान मुलांची भाषा वापरली आहे.
