लेक
लेक
अंकुरले बीज |पोटी आली लेक
संस्कार हो नेक| करीतसे||१||
सुंदर कोमल | नाजूक देखणी
ती लावण्यखणी | लेक माझी||२||
चंद्रकले सम| वाढली लाडात
रहावी सुखात | जीवनात||३||
सौंदर्याची खाण|प्रेमाचा सागर
धनाची घागर| लाडकी गं||४||
जोडीदार छान| मिळाला जीवनी
हास्य ते वदनी | तिच्या दिसे||४||
दोन घराण्याचे| वंश उद्वारणी
संसार तारणी| गुणवंत ||५||
वंशवेल वाढे| लेकीच्या कुशीत
किती आनंदित | वाटे मज||६||
असे जीवाभावा| एक तरी लेक
सुविचार नेक | मनोमनी||७||