STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

3  

Pratibha Vibhute

Inspirational

गृहलक्ष्मी

गृहलक्ष्मी

1 min
175

सप्तपदी ओलांडून

आली सुनबाई घरी

आनंदले मन माझे

गृहलक्ष्मी जणू परी...१


दिसे लाखात देखणी

उच्च शिक्षीत, हुशार

माणुसकी तिच्या ठायी

आवडते मला फार...२


पोटी नव्हती मुलगी

त्याच म्हणे मला आई

वाटे भरून पावले

जीव लावता त्या बाई...३


संसारात आहे दक्ष

वाटे त्यांचा अभिमान

भाग्यवान उभयता

दोन्ही सुना खूप छान...४


शाबासकी देते सासू

सून नव्हेच त्या लेकी

बाळ गोपाळ सदनी

सांभाळून एकमेकी...५


आजवर हा संसार

जीवापाड मी जपला

पुढे सांभाळून घ्यावे

परिवार ग आपला...६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational