STORYMIRROR

Santosh Jadhav

Tragedy Inspirational

4  

Santosh Jadhav

Tragedy Inspirational

काळीज

काळीज

1 min
398

देशकार्य करणाऱ्या सैनिकांचं, पोलिसांचं

म्हणतात काळीज खूप कठोर असतं

पण दिसतं तसं नसतं

मित्रहो!त्यांनाही काळीज असतं


    देशासाठी ते आपलं

    आयुष्य नौछावर करतात

    पण कुटुंबियांच्या प्रेमासाठी

    ते सतत मनोमनी झुरतात


कुटुंबियांना भेटण्यासाठी काही दिवसांची

रजा घेऊन ते घरी येतात

अचानक हेडऑफिसमधून फोन येताच

आहोरात्रीही ते तसेच निघून जातात


    देशरक्षणासाठी माझे जवान

    छातीवर गोळ्या झेलतात

    अखेरचा स्वास घेत असताना

   आईबाप,बायको-पोरं,भाऊ-बहीण       

   यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी झुरतात


तेही नशिबात नसल्यानं

काळजावर दगड ठेऊन

हसत हसत या भूमातेचा

आशीर्वाद घेऊन शहीद होतात


    अचानक त्या शहीद जवानाचं

    पार्थिव घरी येतं

    त्या कुटुंबियांनाच विचारा

    काळजाचा तुकडा गेल्यावर

    दुःख किती होतं...!


म्हणून म्हणतो माझ्या जवानांचं

काळीज कठोर नसतं

जस जसे त्यावर आघात होतात

तस तसं ते तीळतीळ तुटत असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy