STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy Inspirational

4  

Deepali Mathane

Tragedy Inspirational

आठवणींची साठवण

आठवणींची साठवण

1 min
356

आठवणींच्या ओंजळीत

सुखद आठवणींचा मेवा

आयुष्यभर पुरेल असा

गोड साठवणींचा ठेवा

    जगण्याच्या उमेदिला

    सुखस्वप्नांचा दीप हवा

    पुरलेल्या जाणीवेला

    उधळून एक श्वास नवा

फुललेल्या क्षणात

गंध वेड लावी जीवा

उमलत्या निरागस कळीचा

सजलेला साज नवा

     ओथंबलेल्या घनाचा

      सुखद स्पर्श व्हावा

      चाहूल आठवणींची

      देत असे गुलाबी हवा

हिऱ्यामाणकांच्या आठवणी

अनुपम मंगल ही भेट देवा

या जाणीवेनेच तृप्त जाहले

मलाच वाटे माझा हेवा.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy