माणुसकी
माणुसकी
ऋणानुबंधाचे दिले गोड उपहार माणसाने तरी भावनांचा केला व्यवहार माणसाने
ढासळत चालल्या दिवसेंदिवस
विटा माणुसकीच्या भिंतीच्या
उरलेच नाही माणसात माणूस पण कुठे,
भरतील कधी रित्या घागरी प्रेमाच्या
कसा मांडला या जीवनाचा बाजार माणसाने
होत असे त्या काळी एकमेकात फक्त संवाद
पण त्याउलट आज होतात शब्दाशब्दांवरून वाद
कोणी धनस्वार्थ छळतो, कोणी वृद्धाश्रम धाडतो
विसरावे जन्मदात्याचे कसे उपकार माणसाने
माणसाशी माणसासम वागणे यांची रीत ही हरवली माणुसकीस केले कसे घाव आरपार माणसाने
दया-क्षमा-शांती ही तर माणुसकीची आभूषणे
नको ठेवू कुठे गहान ही तर तुझ्या जिवंतपणाची लक्षणे
तुटलेल्या नात्याचा बंध जुळून घट्ट व्हावा जीवनात हरवलेली माणुसकी, आपली माणस यावी पुन्हा आयुष्यात असतील काही हेवे-दावे आठवणीतून जाळावे आपुलकीचा हात घेऊन सहज सोबतीने चालावे आता तरी माणसाने...
