बघ जरा जगून
बघ जरा जगून
उद्या बघू, परवा बघू म्हणत जीवन जाते निघून,
आज तुझ्या हातात आहे तर बघ जरा जगून...
काल गेला हातातून तुझ्या असा हा निघून,
नाही येणार आता तो कधीच तुझ्यासाठी परतून...
जीवन म्हणजे असे बुडबुडा पाण्याचा,
कधी फुटेल नाही भरवसा हा त्याचा
फरक काहीच पडणार नाही वाट बघत बसून,
आज तुझ्या हातात आहे तर बघ जरा जगून...
